#kavyotsav
हे मृदा मोल तुझे अनमोल
पण तू कधी न केला बोल
अनेक वन फल फुलांना
काट्याकुट्यांना जन्म दिला तू
अनेक खनिज लवणांशानी
जैविकांशानी संपन्न तुझे गुण
पण तू कधी गेला बोल
हे मृदा मोल तुझे अनमोल ....
शेतकऱ्यांना तुझाच आस
पिकांना तुझाच ध्यास
कुंभाराला तुझाच कयास
साऱ्यांनाच तू दिला उद्योग
केले समृद्ध हे लोक
पण कधी न केला बोल
हे मृदा मोल तुझे अनमोल ....
मानवाने केली तुझ्यावर किती सक्ती
पण तू दिलीस त्याला जगण्याचे युक्ती
साऱ्या चराचरांना तुझीच शक्ती
किती केली तरी कमी तुझी भक्ती
पण तू कधी न केला बोल
हे मृदा मोल तुझे अनमोल....