⭐पनीर भुर्जी....
⭐साहित्य
पनीर दोन वाटया
एक कांदा बारीक चिरुन
एक टॉमॅटो बारीक चिरुन
कसूरी मेथी
एक मिरची चिरुन
कोल्हापुरी कांदा लसूण चटणी/गरम मसाला
एक चमचा तिखट
कोथिंबीर
⭐कृती
प्रथम पनीर बारीक करून अथवा कीसून घ्यावे
थोडया जास्त तेलावर (यामुळे चव आणखी चांगली लागते)
⭐कांदा थोडा गुलाबी करून घ्यावा
बारीक मिरची ,कसूरी मेथी घालावी
एक चमचा तिखट व कांदा लसूण मसाला थोडा परतून
टोमॅटो घालावे
⭐टोमॅटो थोडा मऊ होऊन एकजीव झाला की
पनीर घालून चांगले परतून घ्यावे
चांगल्या दोन तीन वाफा द्याव्यात
झाकण ठेवायची गरज नाही
पनीर लगेच शिजते
⭐शेवटी चवीनुसार मीठ घालून
वरती कोथिंबीर घालावी
ही परोठा पोळी सोबत खाऊ शकता
पावा सोबत अतीशय छान लागते
त्यामुळे सोबत कोल्हापूरचा फेमस बनपाव 😋