#उपवासाचे_पदार्थ  
⭐राजगिरा पीठ रताळे वडे
⭐साहित्य
लाल रताळी दोन
(पांढरी पण वापरू शकता)
दोन वाट्या राजगिरा पीठ 
अर्धी वाटी दाण्याचे कूट 
साखर एक चमचा 
वाटीभर ताक 
बारीक मिरची चिरुन आणि मीठ चवीनुसार 
जीरे चमचाभर 
कोथींबीर 
⭐कृती 
लाल रताळी धुवून किसून घेतली 
हा कीस कच्चाच घेतला 
राजगिरा पीठ दाण्याचे कूट साखर बारीक मिरची जिरे चिरलेली कोथींबीर 
हे सर्व मीठ व ताक घालुन एकत्र केले
वर थोडे गरम तेलाचे मोहन घालून 
लागल्यास थोडे पाणी घालुन भिजवुन गोळा करून ठेवून 
अर्धा तास झाकुन ठेवले 
⭐अर्ध्या तासानंतर तेल कडकडीत तापवून आच मंद केली 
व हाताला थोडे तेल लावुन तयार मिश्रणाचे वडे हातावर थापून मध्ये भोक पडले
मंद आचेवर खरपूस तळून घेतले 
⭐बाहेरून कुरकुरीत व आतून छान खुसखुशीत होतात 
सोबत ताक
तळलेले नको असल्यास याचे थालीपीठ सुद्धा उत्तम होते...