☘️भरली कारली
कारली आमच्या घरातला अगदी आवडत पदार्थ ..
मी थोडीशी अपवाद आहे त्याला .. 😀
ही भरली कारली मात्र अतिशय हीट आहेत
☘️साहित्य
चार पांढरी कारली (हिरवी शक्यतो नको )
ओले खोबरे . दाण्याचे कूट ,काळा मसाला ,गूळ ,थोडा लिंबू रस
☘️कृती
कारली बुडखा व देठ काढून त्यावर चाकूने एक खोल चीर
करून घ्यावी जेणे करून कारले उघडले जाईल .
चमच्याने आतील सर्व बिया व गर काढून टाकणे .
आता या बिया व गर काढलेल्या संपूर्ण खोल भागात
एका कारल्यात दोन मध्यम चमचे अशा अंदाजाने
मीठ पसरून भरून घेणे .
☘️ही सर्व कारली एका ताटलीत ठेवून त्यावर काही जड वजन ठेवणे जेणे करून कारली थोडी चपटी होतील
व आतील कडवटपणा बाहेर पडण्यास मदत होईल .
(माझ्याकडे एक बत्ता आहे तो मी वापरते )
☘️रात्री कारल्यात मीठ भरून सकाळपर्यंत ठेवायचे आहे
आता आत भरायचे सारण पण चार पांच प्रकारचे करता येते
फक्त एकच लक्षात ठेवायचे कारल्यात मीठ भरले असल्याने
जरी कारली नंतर धुवून घेतली तरी मिठाचा अंश राहातोच .
त्यामुळे सारणात मीठ बेताने घालणे
1)..बारीक कांदा ,ओले खोबरे , कांदा लसूण चटणी
2).. ओले खोबरे . दाण्याचे कूट ,काळा मसाला ,गूळ ,थोडा लिंबू रस
3)..बारीक चिरलेला कांदा परतून घेणे ,कांदा मऊ झाला की
त्यावर बारीक चिरलेला टोमॅटो घालणे . त्यानंतर गरम मसाला तिखट घालणे
4)..बारीक कांदा ,उकडलेला बटाटा ,आले लसूण
5) ..किसलेले पनीर, बारीक कांदा,बारीक मिरची ,कोथिंबीर
अथवा इतर कोणतेही तुमच्या आवडीचे सारण ..
☘️सकाळी ही कारली काढून आतील मीठ धुवून घेणे .
या कारल्या मध्ये सारण गच्च भरून वरुन ही कारली दोऱ्याने गुंडाळून घ्यावीत .
☘️कुकरच्या भांड्यात पाणी न घालता कोरडीच वाफवून घेणे
एक शिट्टी पुरेशी आहे
फार शिजवायची नाहीत .
☘️कारली थंड झाली की एका पॅन मध्ये तेल घालून सोनेरी
रंगावर शालो फ्राय करून घेणे
खायला घेताना दोरा काढून तुकडे करून घेणे