🟢कैरीची डाळ 🟢
🟢साहित्य
एक कैरी
एक वाटी हरबरा डाळ
हिरवी मिरची
लाल मिरची
कोथिंबीर
ओले खोबरे
कढीलिंब
जिरे
मोहरी हिंग फोडणीचे साहित्य
🟢कृती
हरबरा डाळ रात्री भिजवुन
सकाळी एखादी मिरची, जिरे मीठ घालून जाडसर वाटावी
मोहरी, हींग, कढीलिंब,सुक्या लाल मिरच्या घालून फोडणी करावी
वाटलेल्या डाळीत साखर मीठ चवीनुसार घालून
त्यात कैरीचा कीस घालून मिसळून घ्यावा
वर फोडणी घालुन एकत्र करावे
ओले खोबरे कोथिंबीर घालून सजवावे