🍊संत्रा ज्यूस
या मोसमातील रंगीत आणि चवदार थंडगार आकर्षण💗
साहित्य
पाच संत्री
एक चमचा भाजलेली जीरे पूड
एक चमचा सैंधव मीठ
अर्धा चमचा साधे मीठ
बर्फ
संत्री सोलून थोडा वेळ पंख्याखाली ठेवली
थोड्या वेळाने बीया काढून साली सोलून गर वेगळा केलाा
सगळ्या गराचा मिक्सरमध्ये रस काढला.
त्यात जीरे पूड आणि काळे मीठ, साधे मीठ टाकले
संत्री गोड असल्याने साखरेची गरज लागली नाही पण संत्री आंबट असतील तर गरजेनुसार साखर टाकून मिक्स करून घ्यावे.
हा झाला संत्र्याचा नैसर्गिक शुद्ध, ज्यूस
सर्व्ह करताना काचेच्या ग्लास मध्ये आधी बर्फाचे खडे टाकून नंतर त्यात ज्यूस टाकावा.
बर्फ टाकायचा नसेल तर तयार ज्यूस थोडावेळ फ्रीजमध्ये ठेवून नंतर थंडगार सर्व्ह करावा.