तुझ्या नजरेतून
तुझ्या नजरेतून माझं आयुष्य,
मी अनेक रंगात रंगवले होते.
मी झालो होतो फक्त तुझाच,
सारे जग मज अनोळखी होते.
श्वास तूच आणि स्पंदन ही तू,
वेड्या माझ्या जीवाला वेड तुझेच होते.
तप्त त्या उन्हा मध्ये सावली होती तू,
कोसळणाऱ्या पावसात रूप तुझेच होते.
तुझ्याच तर शब्दांना मी माझ्या,
कवितेत कायमचे जपून ठेवले होते.
ना समजली तुला कधी प्रीत माझी,
गायले जे मी गीत,सुर तुझेच तर होते.
नव्हताच अर्थ कशाला,
उगाचच जगणं माझे ओझे होते.
तुझ्या नजरेतून माझे आयुष्य,
पुन्हा एकदा उध्वस्त झाले होते.
समाप्त.