हल्ली बघावे जिकडे तिकडे
दिसतेस मजला फक्त तू
काही उमजत नाही हृदयाला
सांग तरी मी काय पाहू
येतांना जातांना रस्त्यावर
नजर शोधते गं तुजला
तुज पाहिल्याशिवाय क्षणभर
चैन पड़े ना मजला
काय म्हणावं याला
मज प्रेम कि वेडेपण
सत्य मात्र एकच आहे
गुंतले तुझ्यात माझे मन
भवितव्य माझिया प्रेमाचे
काय असेल ते तोच जाणे
विसरून सर्व दुनियेला मात्र
हृदय गातोय तुझीयेच गाणे
तूच माझिये गीत
अन तूच माझी कविता
अविरत रहावी वाहत
मज प्रेमाची गं सरिता
हातात हात घेवून असेच
चालावे गं आपुले जीवन
तुझियाच प्रेमळ कुशीत सखे
मज यावे शेवटी मरण
स्वरचित
गजेन्द्र गोविंदराव कूडमाते