आयुष्यात बरेच क्षण 'मोह'बनुन समोर येतात. तो मोह कुठल्याही रुपाने येवु शकतो. प्रेम, संपत्ती, सत्ता, पद, वासना, प्रतिष्ठा, प्रसिद्धी..! अशा अनेक रुपांनी तो मोहाचा क्षण समोर येवु शकतो. आणि तीच खरी परिक्षा असते आपल्या संयमाची..अशा मोहाच्या क्षणी जो शांत राहून पुढचा आणि मागचा विचार करतो, जो क्षणिक सुखाच्या ऐवजी निरंतर योग्यतेची निवड करतो, जो अशा प्रसंगी स्वतःचा सदविवेक जागा ठेवतो, तोच आयुष्यात खुप काही मिळवतो. छोट्या छोट्या मोहांना ओळखुन त्यांचा त्याग करणाऱ्याचे अंतिम ध्येय नक्की पूर्ण होते.
- साधना वालचंद कस्पटे ©🌸