आज 15 ऑगस्ट, स्वातंत्र्य दिन. आज बऱ्याच जणांनी तिरंगा विकत घेतला असेल, कोणी WhatsApp la statue ठेवलं असेल, dp ठेवला असेल. कोणी तिरंग्याच्या रंगाचे कपडे, ओढणी, बांगड्या घातल्या असतील. कोणी टिकली लावली असेल. पण मी यातलं काहीच करत नाही. कारण मला माझ्या देशावरील प्रेम व्यक्त करायला निमित्त लागत नाही. मी भारतीय आहे..आणि याचा मला प्रचंड अभिमान आहे. देश प्रेम व्यक्त करण्याची माझी पद्धत वेगळी आहे.
इथे मला काही उदाहरण द्यायला आवडेल. फिरायला गेल्यावर माझ्या एका इंजिनिअर मित्राने चालता चालता रोडवर कचरा फेकला. मी कारण विचारल्यावर तो म्हणाला " अरे सारी दुनिया टाकतेय मी एकट्याने टाकलं तर काय होतय. & I was shocked. कारण एखादी व्यक्ती एवढं शिक्षण घेवून ही अशी वागत असेल तर काय बोलावं?" आणि ह्याच मित्राने १५ ऑगस्ट ला बरोबर रात्री १२ वाजता मेरा भारत महान वगैरे status ठेवले. मला ही देशभक्ती कळली नाही.असे अनेक प्रसंग आहेत.
मला माझ्या देशाने दिलेल्या स्वातंत्र्याचा, लोकशाहीचा अभिमान आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक महान लोकांनी दिलेलं बलिदान मी कधीही विसरणार नाही. त्यामुळे या स्वातंत्र्याचा मला आदर आहे. आणि त्याचा योग्य वापर करणे हीच माझी देशभक्ती आहे. मी माझ्याच देशात राहून माझ्या देशाच्या विरोधात कधीच बोलत नाही. माझ्या समोर कोणी देशाला नावं ठेवत असेल तर मी त्याला सांगते की कधीच देश चांगला वाईट नसतो.. तिथले लोक असतात. मी कधीही traffic चे नियम तोडत नाही. मी आजपर्यंत कधीच कुठल्याही ट्रेन मध्ये, बस मध्ये, रस्त्यावर, नदी मध्ये, समुद्र मध्ये कचरा फेकला नाही. सार्वजनिक शौचालय मध्ये saintery pad इतरत्र टाकले नाहीत. कधीही फुकट प्रवास केला नाही. कुठलही काम करण्यासाठी लाच दिली नाही. सोशल मीडिया वर देश विरोधी पोस्ट, जातीवाचक, धर्मविरोधी पोस्ट शेअर केली नाही की तशा गोष्टींना प्रोत्साहन दिलं नाही. चंद्रयान असो की कुठलाही नवीन तांत्रिक प्रयोग जो देशहितासाठी केला गेला पण पहिल्या प्रयत्नात अयशस्वी झाला... त्यावर मी कधीही टोलेबाजी केली नाही किंवा देशावर अविश्वास दाखवला नाही. कधी परदेशी पर्यटक भेटले तर त्यांच्या मनात देशाबद्दल खराब भावना निर्माण होईल असं वागले नाही.कुठलाही देश हा झटक्यात परिपूर्ण होत नसतो..त्याला एका प्रोसेस मधूनच जावं लागतं. त्यातून आपला देश कसा सुटेल. प्रत्येक व्यक्ती ही प्रथम देशाचा नागरिक असते आणि प्रत्येक नागरिक देशाचं प्रतनिधित्व करत असतो. हे मी लक्षात ठेवून चालते.माझ्या देशात होवून गेलेल्या महान व्यक्तींचे मी फोटो , मुर्त्या बाळगत नाही. पण त्यांचे आचार विचार आत्मसात करण्याचा नेहमी प्रयत्न करते. आणि मला वाटतं हीच माझी देशभक्ती. आज मी जी काही प्रगती करू शकले त्यात माझ्या देशाचा वाटा सिंहाचा आहे. कारण ज्यांनी बलिदान देवून देशाला स्वातंत्र्य बहाल केलं त्यांच्या मुळेच मी, तुम्ही, आपण आज स्वतंत्र आहोत. त्यांच्यामुळेच शिक्षण घेवू शकलो आणि प्रगतशील माणूस बनू शकलो. खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य आणि लोकशाही मिळवून देणाऱ्या सर्वांना सलाम !!
- साधना वालचंद कस्पटे © ?