Marathi Quote in Story by मच्छिंद्र माळी

Story quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

###Good morning !
@मच्छिंद्र माळी औरंगाबाद .
* " बोध कथा " *
---------------------------
*?वारकरीपुष्प*?

*मानवी जीवनासाठी बोध*
एकदा एक गाय जंगलात चरण्यासाठी बाहेर पडली. तेवढ्यात तिला तिच्याकडे एक वाघ धावत येताना दिसला. ती मागे वळली आणि पळू लागली, कारण कोणत्याही क्षणी वाघाचे पंजे तिच्यामध्ये घुसले असते. गायीने हताशपणे पळून जाण्यासाठी इकडे तिकडे पाहिले आणि शेवटी तिला एक उथळ तलाव दिसला. वाघाच्या तावडीतून निसटून जाण्यासाठी तिने तळ्यात उडी मारली आणि पाठलागाच्या तावात वाघानेही तिच्यावर उडी घेतली.
त्या दोघांसाठी आश्चर्य म्हणजे तलाव अत्यंत उथळ होता पण तो चिखलाने खोलवर भरलेला होता. एकमेकांच्या झटापटीनंतर गाय आणि वाघास आढळले की त्यांच्यामध्ये थोडेच अंतर उरलेले आहे. पण ते चिखलात खोलवर रुतले आहेत. दोघांचे पाण्यावर डोके होते पण जरी त्यांनी खूप धडपड करूनही ते स्वत:ला मुक्त करू शकले नाहीत.
वाघ वारंवार गायीकडे पाहून गुरगुरत डरकाळ्या फोडत होता. परंतु काही करू शकत नव्हता. नंतर
वाघ स्वतःला मुक्त करण्यासाठी धडपडताना पाहून गाय विचारपूर्वक हसली आणि तीने वाघाला विचारले, *"तुला मालक आहे कां?"* *"मी जंगलाचा राजा आहे. मला मालक आहे कां म्हणून तू मला कां विचारतेस? मी स्वत:च या जंगलाचा स्वामी आहे!"*
गाय म्हणाली, *"तू जंगलचा राजा असशील, पण इथे तुझी सर्व शक्ती तुझे जीवन वाचवण्यात अपयशी ठरली आहे."*
*"आणि तुझ्याबद्दल काय?"* वाघ उत्तरला. *"तू पण इथेच या चिखलात मरणार आहेस!"*
*"नाही, मी मरणार नाही!"*


गायीने नम्रपणे उत्तर दिले, *"नाही, मी मरणार नाही!",आणि स्वत:लाही मुक्त करू शकत नाही, पण माझा धनी तर ते करू शकतो. सूर्य अस्ताला आल्यानंतर जेंव्हा मी घरी नाही हे पाहून तो मला शोधत येईल. एकदा कां मी त्याला सापडले की, तो मला सोडवून मला आनंदाने त्याच्या घरी घेऊन जाईल!"*
वाघ गप्प झाला आणि गायीला बघत राहिला.
लवकरच सूर्यास्त झाला तसा गायीच्या मालकाचे आगमन झाले. त्याने ताबडतोब झालेली परिस्थिती ओळखली आणि गायीला चिखलातून काढून सुरक्षित घराकडे नेले. घराकडे जात असताना, गाय आणि मालक दोघेही एकमेकांबद्दल कृतज्ञ होते आणि वाघांची दया येऊन त्याला वाचविता आले असते तर त्यांना आनंदच झाला असता.

*येथे गाय एक आत्मसमर्पणशील हृदयाचे प्रतिनिधित्व करते, वाघ एका अहंकारी मनाचे प्रतिनिधित्व करतो आणि मालक गुरुचे प्रतिनिधित्व करतो. चिखल जगाचे प्रतिनिधित्व करते आणि पाठलाग आपले अस्तित्व राखण्यासाठी लागणाऱ्या संघर्षाचे प्रतिनिधित्व करतो.*

*बोध:*
स्वतंत्र असणे आणि कोणावरही अवलंबून न राहणे हे उत्तमच आहे. परंतु हे खूपच टोकापर्यंत ताणू नका ..
आपल्याला नेहमी आपल्या मित्र-मैत्रिणींची / जोडीदाराची / प्रशिक्षकांची / गुरुंची आणि गुरु समान सर्व बंधू-भगिनींची आवश्यकता असते; जे नेहमी आपल्यावर जेष्ठत्वाने लक्ष ठेवत असतात ...

*याचा अर्थ असा नाही की; आपण कमजोर आहाेत ! फक्त त्यांच्या सहकार्याने आपण आणखी मजबूत होऊ शकताे इतकेच* !

*??रामकृष्णहरि* ??

Marathi Story by मच्छिंद्र माळी : 111216845
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now