## संत कथा ## चमत्कार # ( संत नामदेव चरित्र )
*संत नामदेवांची अपरंपार ईश्वर भक्ती*
"नामदेवा ! तूं मोठा अवलिया आहेस !"
असे तुझे जातभाई सांगतात; तर आता ही मेलेली गाय जीवंत कर नाहीतर तुम्हां सर्वांना बाटवून मुसलमान करुं !"
कर्नाटकातील बेदर गावाजवळ संत नामदेव महाराज व इतर २०४ संत-साधूं सोबत जात असताना बेदरच्या सुलतानाने त्यांना अटक करुन दरबारात आणण्याचे फर्मान काढले.
सैनिकांनी त्यांना पकडून सुलतानापुढे उभे केले. हिंदूंना शिक्षा म्हणून सुलतानाने एक गाय आणून खाटकाला बोलावून घेतले. खाटकाने एका क्षणात नामदेव इतर साधु संतांसमोर गायीचा शिर धडावेगळे केले.
मग तो नामदेवांकडे वळून म्हणाला, "तूं मोठा अवलिया आहेस ना ! तर मग ही मेलेली गाय जर तु जीवंत केलीस तर आम्ही तुम्हांला सोडून देऊ नाहीतर बाटवून मुसलमान करु" असे म्हणताच सगळीकडे रडारड सुरु झाली.
नामदेवांनी धेनूचे मस्तक मांडीवर घेतले आणि पांडुरंगाचा धावा सुरू केला. तो ऐकून भक्तवत्सल पांडुरंग लगेच गुप्तपणे नामदेवांच्या पाठीशी येऊन उभे राहिले.
नामदेवांनी ज्ञानदृष्टीने ते पाहिले. तेव्हा त्यांना धीर आला. त्यांनी गायीच्या शीरावरुन आपला हात फिरवला, तोच ते धडापासून वेगळे झालेले शिर आपोआप जडून गाय उठून उभी राहिली. सर्व वैष्णवांनी "पुंडलिक वरदे हरी विठ्ठल" नावाचा गजर केला.
सुलतान आणि इतर मंडळी जागच्या जागी थिजून उभी राहिली. लज्जेने सर्वांनी माना खाली घातल्या.नामदेवांनी भगवंताचे मनोमन आभार मानून डोळ्यातील अश्रुंना वाट मोकळी करुन दिली.
*!! रामकृष्ण हरी !!*
?