#काव्यत्सव 2# प्रेरणा
आनंदाचे क्षण
काही आनंदाचे क्षण
मरगळलेल्या जीवनातील
यातनावर मलमाचा लेप लावून येतात
तेव्हा हलकसं बरं वाटते
आपणही त्या जखमावर
फुंकर मारुन
वेदनाच्या आक्रोशाचा हुंदका
कमी करतोच ना !
हेच तर गणित आहे
स्वतःला फुलवण्याचं शास्त्र
समजायला हवं असं काही नाही
अलगद आपण ती कृती करतोच ना !
म्हणून काय सुकलेल्या जखमेच्या
खिपल्यावर फुंकर मारायची.
"वह साल दुसरा था. यह साल दुसरा है!"
गझलेच्या मंथितार्थ क्षणाला कवटाळत
पुन्हा उभे व्हावे वेदनाशी लढायला.
गडकोटावर फडकवलेल्या
ध्वजांचा रंग मात्र शोधतो.
घटनेच्या पाना पानात.
माझ्या आणि तुझ्याही वेदना
रंग रक्ताचा सारखाच होता
आणि तो शास्त्रज्ञ बनून
रक्ताचे रंगच शोधतो आहे लँबमध्ये
त्याला म्हटलं
तू या प्रेतांचे रंग शोध...
अवाक् होऊन बघत हसतो तो.
त्याला अनंत वेदना झाल्या ..
मी झेंडूबाम मलम...
त्याच्या वेदनावर चोळण्यास दिले.
लगेच तो किंचाळला
बाँम्ब बाँम्ब...
सगळेच पसार...
आता त्याच्याही वेदनाचं शास्त्र
शोधतो
धर्माच्या पानापानात
रंग इथेच मिळतात
वीजधर्जीने....
आणि इतिहातील बखरी हसतात माझेवर
हे युद्ध सत्तेसाठी होते....
या साठीच तर अट्टाहास मित्रा....
शास्त्र आणि शस्त्राकडे बघण्यापेक्षा
शस्त्रक्रियेकडे बघ.....
संजय येरणे. 9404121098