###### मराठी नितीकथा !#####$$$
३ "स्वभावाला औषध नाही"
मच्छिंद्र माळी पडेगांव, औरंगाबाद.
सदूबा नावाचा एक शेतकरी होता. त्याने एक कुत्रा पाळला. तो लहान असतांना सदूबा त्याची खुप काळजी घ्यायचा. कुत्र्यावर तो फार प्रेम करायचा. कुत्रा त्याचा अत्यंत लाडका होता.त्याने कुत्र्याचे नाव "वाघ्या" असे ठेवले होते. त्याला तो वाघ्या वाघ्या नावानेच हाक मारायचा.
एके दिवशी पहाटेच सदूबा आणि त्याचा कुत्रा वाघ्या शेतावर जायला निघाले.रस्त्याने काही अंतर चालुन गेल्यावर वाघ्याला एक ससा दिसला.कुत्रा जातीचा शिकारी स्वभावाचा असल्याने त्या सशाला पहाताच मूळ स्वभाव उफाळून आला.तो सशाला पकडण्यासाठी सशाच्या पाठीमागे धावू लागला. पण ससा अतिशय चपळ प्राणी.तो कुत्र्याला कसचा घावतोय.? ससा लगेच पळुन गेला. पण सशामागे बेभानपणे पळणारा वाघ्या मात्र रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत तोल जाऊन पडला. विहिरीत पाणी फार नव्हते. पण विहिर खोल होती. सदूबाने चार माणसांना बोलावले. दोराच्या व पाळण्याच्या सहाय्याने कुत्र्याला बाहेर काढण्यासाठी तो विहिरीत उतरला. तळाशी पोहचताच पाण्यात भिजलेल्या व थंडीने कुडकुडणा-या कुत्र्याला त्याने वर उचलण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो कुत्रा त्याच्या हाताला कडाडून चावला.सदूबा कुत्र्याला रागानं म्हणाला, 'अरे मी तुला वाचविण्याचा प्रयत्न केला तर उलट तुच मला चावलास? तुझा जीव वाचविण्याचा उपकार करण्या-यालाच तु चावून त्याला दुःख देऊन अपकार केलास? आता या विहिरीतच कुडकुडत! ' असे रागाने म्हणत सदूबा पाण्यातुन विहिरी बाहेर आला.
तात्पर्यः - "उपकार करणा-यावर अपकार करु नये" 'एखाद्यावर कितीही प्रेम केले तरी त्याचा मूळ स्वभाव काही बदलत नाही '
-------------------------------------------------------------------
मराठी नितीकथा
----------------------
४ " आदर्श शिक्षक "
मच्छिंद्र माळी पडेगांव औरंगाबाद.
आठेवाडीच्या शाळेत मुलांची परिक्षा चालू होती. एका वर्गावर नविनच लागलेले श्रीधर जोशी नावाचे शिक्षक सुपरव्हिजन करण्याचे कर्तव्य बजावण्याचे काम करीत होते.
मुलांचे पेपर लिहिण्याचे सुरु होऊन अर्धा तास झाला असेल तेव्हा त्यांना वर्गात एक विद्यार्थी काॕपी करीत असतांना आढळून आला.त्यांनी त्याला वर्गाचे बाहेर काढून दिले. तो मुलगा त्या शाळेच्या मुख्याध्यापकांचा होता. जेव्हा परिक्षेचा निकाल जाहिर झाला तेव्हा तो मुलगा परिक्षेत नापास झाला. तेव्हा तेथिल जुन्या शिक्षक वृंदापैकी काही शिक्षक नविन शिक्षकाला म्हणाले, ' आता तुमची काही धडगत नाही, मुख्याध्यापक तुमच्यावर जाम रागावले असतील! कशाला विनाकारण उगाच पंगा घेऊन पयावर धोंडा पाडून घेतलात हो? बहूतेक आता तुम्हांला नोकरीवर पाणी देखिल सोडावे लागेल!' आसे अंदाजही बोलून दाखविले. ह्या नवख्या शिक्षकाने अगोदरच नोकरीचा राजीनामा खिश्यात तयार ठेवून येणारे प्रसंगाला सामोरे जाण्याची तयारी केली होती. हे कीणालाही माहित नव्हते. इतक्यात शाळेतील शिपायाने येऊन त्या शिक्षकाला हेडसरांनी बोलावले असल्याचा आदेश दिला.जोशी घाबरत घाबरतच मुख्याध्यापकांच्या कार्यालयात शिरले.हेडसरांना नमस्कार करुन खुर्चीवर बसले व हळूच खिश्यातील ' राजीनामा ' मुख्याध्यापकांसमोर ठेवला. त्यावर हेडसरांनी पाठ थोपटून म्हणाले " निर्भीडपणे वागणारी माणसेच कुठल्याही बिकट संकटाला खंबीरपणे तोंड देण्याचे धैर्य दाखऊ शकतात. हेच तुमच्या या राजीनाम्याने सिद्ध केले आहे. पण मी तुमचा राजीनामा स्वीकारणार नाही.आपण शिक्षकचे काम चोखपणे केले. मला या गोष्टीचा सार्थ अभिमान आहे. माझ्या मुलावरही कारवाई करतांनाही तुम्ही मागेपुढे पाहिले नाही.ही फार कौतुकास्पद गोष्ट आहे. मात्र जर का तुम्ही त्याचे चूकीवर नजरअंदाज करुन पांघरुन पांघरूण टाकून त्याला पास केले आसते त्याच्या चुकीच्या कामाला प्रोत्साहन दिले असते तर मात्र मी तुम्हांला नोकरीवरून काढून टाकायलाही कमी केले नसते. नवनियुक्त शिक्षकाचे आदर्श आचरण पाहून मुख्याध्यापकांना आनंद झाला.
तात्पर्यः - " शिक्षकाचे वर्तन व आचरण प्रत्येक क्षणी आदर्श व योग्य असले पाहिजे.असे आदर्श शिक्षकच चांगले विद्यार्थी , नितीमान समज आणि बलशाली राष्ट्र निर्माण करु शकतात "
*****************************************