उत्तरायणाची ऊब ,भूमीची कृतज्ञता
संक्रांतीच्या वाणात, भरून राहिली आस्था!
बाजरीच्या भाकरीला, तीळाची ओढ
स्नेहाच्या बंधाने नाते होईल गोड!
पतंग उंच आकाशी ,घेई थुईथुई भरारी
तिळगुळाच्या वडीची, चव रेंगाळे जिभेवरी!
वसा लुटू प्रेमाचा, वसा लुटू मांगल्याचा
जपू उरी मान, निसर्ग आणि भूमीचा!
आर्याकडून सर्व वाचकांना शुभेच्छा!