तू
तू पहाटेच ऊठतेस
नहाणे करतेस
अंगण सडा रांगोळी करतेस
वातावरण सारे प्रसन्न करतेस.
बरोबरीने गतिमान होतेस
स्वतः सोबत घराची प्रगती करतेस
दोन्ही घराण्याचे नाव मोठे करतेस
जगात स्वतःला सिद्ध करतेस.
सायंकाळी दिवे लावतेस
मंत्र उच्चार करतेस
मुले संस्कारीत करतेस
आयुष्य सुंगधी करतेस सर्वांचे.
तू शक्ती तूच दिव्यता भासतेस
तूच खरी भगवती असतेस
तू माय बहीण अर्धांगीनी लेक असतेस
तुझ्या समोर माझे मस्तक आदराने झुकते.
**केदार शेवाळकर**