'आईना’
अरे आईना खोटे बोलू नकोस तू
उगा फसव्या गोष्टी दावू नकोस तू
भले कैद रुप माझे तुझात,
ऊगा रुपास नवी चौकट लावू नकोस तू.
आरशात माझे रूप बेहाल झाले
आरशाचे पहा गाल लाल झाले
भले असेल दूनीया रंगीबेरंगी तुझी
ऊगा बेगड मजला लावू नकोस तू.
मेख मलाही तुझी माहित आहे
तुला आईना साथ पाऱ्या ची आहे
जे आत येईल तेच दाव बाबा
ऊगा शपथा कुणाच्या घेवू नकोस तू.
*केदार शेवाळकर *