###Good morning ! $$$ संस्कार संहिता !
@मच्छिंद्र माळी औरंगाबाद .
*औक्षण दारात न करता* *वास्तूच्या आतमध्ये का* *करावे ?*
१)‘औक्षण’या शब्दाचा आध्यात्मिक अर्थकाय?
२)औक्षण करण्याचे महत्त्व काय?
अ)संरक्षक-कवच निर्माण होणे
आ)देवतेचा आशीर्वाद मिळण्यास साहाय्य होणे
३. औक्षण कोणाचे करावे?
४. औक्षण कोठे करावे?
५. औक्षण दारात न करता वास्तूच्या आतमध्ये का करावे?
६. औक्षण करण्यासाठी लागणारे साहित्य
औक्षण करणे किंवाओवाळणे,हा हिंदु धर्मात शुभप्रसंगी सांगितलेला छोटासा;पण महत्त्वाचा विधी आहे. वाढदिवस,रक्षाबंधन,भाऊबीज,परदेशगमन,परीक्षेतील यश,युद्धात विजयी होणे अशा शुभप्रसंगी त्या त्या व्यक्तीला ओवाळून शुभेच्छा देण्याचा हा विधी आहे.त्या विधीविषयी जाणून घेऊया !
औक्षण करतांना
---------------------
‘औक्षण’या शब्दाचा आध्यात्मिक अर्थ काय?
‘औक्षण’म्हणजे दिव्याच्या ज्योतीच्या साहाय्याने कार्यरत झालेल्या ब्रह्मांडातील देवतांच्या लहरी पृथ्वीवर येण्याच्या क्षणाचे स्वागत करणे आणितो क्षण टिपून त्याच वेळी त्या लहरींना शरण जाणे.
औक्षण करण्याचे महत्त्व काय?
अ)संरक्षक-कवच निर्माण होणे
औक्षण करतांना तबकातील दिव्याच्या साहाय्याने प्रक्षेपित होणार्या किंवा ग्रहण केल्या जाणार्यालहरींचे, औक्षण करवून घेणार्या जिवाच्यादेहाभोवती गतीमान संरक्षक-कवच निर्माण होते.
आ)देवतेचाआशीर्वाद मिळण्यास साहाय्य होणे
औक्षण करतांना देवतांना शरण जाऊनस्वतःची आध्यात्मिक उन्नती होण्यासाठी प्रार्थना केल्यानेच अपेक्षित फलनिष्पत्ती होण्यास साहाय्य होते.
औक्षण कोणाचे करावे?
लहान मूल,संस्कार्य व्यक्ती,स्वागतमूर्ती,युद्धावर निघालेला सैनिक,राजा आणि संत यांचेऔक्षण करावे.
औक्षण कोठे करावे?
सर्वसाधारणतःज्याचे औक्षण करायचे आहे त्याला घरात देवापुढे बसवून त्याचे औक्षण करावे.
घरात देवापुढे औक्षण करणे
औक्षण दारात न करता वास्तूच्या आतमध्ये का करावे?
‘दाराचा उंबरा हे पाताळातून प्रक्षेपित होणार्या त्रासदायक लहरी ग्रहण करण्याचे आणि त्या पुन्हा पाताळात संक्रमित करण्याचे उत्तम माध्यम आहे.दाराच्या चौकटीमध्ये या त्रासदायक लहरी घनीभूत झालेल्या असतात.दारात उभे राहिल्याने या रज-तमात्मक लहरींनी भारित क्षेत्राचा जिवाला त्रास होतो.जिवाभोवती या त्रासदायक लहरींचा कोश निर्माण होतो.याचा जिवाच्या मनोमयकोशावर परिणाम होऊन तेथील रज-तम कणांचे प्राबल्य वाढल्याने जीव चिडचिडा बनतो.या कारणास्तव दारात औक्षण करणे,हे हिंदु धर्माला संमत नाही.दारातऔक्षण करण्यापेक्षा दाराच्याआतल्या भागात,म्हणजेच वास्तूत, शक्यतो देवघरासमोर औक्षण करावे.देवघरासमोर रांगोळीचे स्वस्तिक काढून त्यावर पाट मांडून मगच औक्षण करावे.असे केल्याने देवतेचे वातावरणातील चैतन्य जिवाच्या भावामुळे कार्यरत होऊन त्याचा जिवाला अपेक्षित लाभ मिळण्यास आणि त्याला पुढील कार्यास अपेक्षित असे देवतेचे आशीर्वादरूपी बळ मिळण्यास साहाय्य होते.’
औक्षण करण्यासाठी लागणारे साहित्य
हळद-कुंकू,अक्षता,कापसाच्या वाती,तेल,निरांजन, सोन्याची अंगठी, पूजेची सुपारी इत्यादी.
साहित्याची तबकातील रचना
१. अंगठी आणि सुपारी हे प्रत्यक्ष कार्य करणार्या शिवाचे (पुरुषतत्त्वाचे) प्रतीक म्हणून आपल्या उजव्या बाजूला ठेवावे.
२. अक्षता या सर्वसमावेशक असल्याने त्यांना मध्यभागी, म्हणजेच तबकाच्या केंद्रबिंदूच्या ठिकाणी स्थान द्यावे.
३.अक्षतांच्या थोडेसे पुढे;परंतु मध्यभागी दीपाला स्थान द्यावे.दीप हा जिवाच्या आत्मशक्तीच्या बळावर कार्यरत होणार्या सुषुम्नानाडीचे प्रतीक आहे.हळदकुंकवाच्या माध्यमातून आदिशक्तीची,तर अंगठी आणि सुपारी यांच्या माध्यमातून शिवाची जोड मिळाल्याने देवतांकडून येणार्या आशीर्वादात्मक लहरी अक्षतांकडून जिवाकडे संक्रमित होण्यास साहाय्य झाल्याने, दीपाच्या माध्यमातून कार्यरत झालेल्या सुषुम्नानाडीमुळे जिवाने हाती घेतलेले कार्य देवतेच्या कृपेने सफल होते.अशा प्रकारे तबकातील घटकांची योग्य मांडणी केल्याने जिवाला देवतेच्या तत्त्वाचा अधिक लाभ मिळतो.’
संकलक:औक्षण करण्यासाठी घ्यावयाच्या तबकात ‘हळद-कुंकू आपल्या डाव्या बाजूला ठेवावे’,असे दिले आहे,तर‘पूजेच्या तबकातील घटकांची मांडणी’यात ‘हळद-कुंकू आपल्या उजव्या बाजूला ठेवावे’,असे दिले आहे.या दोन्हींचा समन्वय कसा साधायचा?
एक विद्वान : पूजेच्या तबकातील घटकांची मांडणी औक्षणाच्या तबकात सुपारी आणि अंगठी या घटकांचा समावेश झाल्याने ते ते कार्यत्व हळद-कुंकू या घटकांपेक्षा कनिष्ठ स्तरावर कार्य करणार्या रजोगुणाकडे संक्रमित झाल्याने हळद-कुंकू जिवाच्या डाव्या बाजूला सरकवून अंगठी अन् सुपारी या प्राबल्याने कार्यरत असणार्या रजोगुणी घटकांना जिवाच्या उजव्या बाजूला स्थान दिले आहे. त्या त्या विधीतील कार्यरत रजोगुणी उद्देशाप्रमाणे तो तो घटक जिवाच्या उजव्या किंवा डाव्या बाजूला दर्शवला आहे