Good Quotes in Hindi, Gujarati, Marathi and English | Matrubharti

Good Quotes, often spoken by influential individuals or derived from literature, can spark motivation and encourage people to take action. Whether it's facing challenges or overcoming obstacles, reading or hearing a powerful Good quote can lift spirits and rekindle determination. Good Quotes distill complex ideas or experiences into short, memorable phrases. They carry timeless wisdom that often helps people navigate life situations, offering clarity and insight in just a few words.

Good bites

###Good morning !
@मच्छिंद्र माळी औरंगाबाद .
* " बोध कथा " *
---------------------------
*?वारकरीपुष्प*?

*मानवी जीवनासाठी बोध*
एकदा एक गाय जंगलात चरण्यासाठी बाहेर पडली. तेवढ्यात तिला तिच्याकडे एक वाघ धावत येताना दिसला. ती मागे वळली आणि पळू लागली, कारण कोणत्याही क्षणी वाघाचे पंजे तिच्यामध्ये घुसले असते. गायीने हताशपणे पळून जाण्यासाठी इकडे तिकडे पाहिले आणि शेवटी तिला एक उथळ तलाव दिसला. वाघाच्या तावडीतून निसटून जाण्यासाठी तिने तळ्यात उडी मारली आणि पाठलागाच्या तावात वाघानेही तिच्यावर उडी घेतली.
त्या दोघांसाठी आश्चर्य म्हणजे तलाव अत्यंत उथळ होता पण तो चिखलाने खोलवर भरलेला होता. एकमेकांच्या झटापटीनंतर गाय आणि वाघास आढळले की त्यांच्यामध्ये थोडेच अंतर उरलेले आहे. पण ते चिखलात खोलवर रुतले आहेत. दोघांचे पाण्यावर डोके होते पण जरी त्यांनी खूप धडपड करूनही ते स्वत:ला मुक्त करू शकले नाहीत.
वाघ वारंवार गायीकडे पाहून गुरगुरत डरकाळ्या फोडत होता. परंतु काही करू शकत नव्हता. नंतर
वाघ स्वतःला मुक्त करण्यासाठी धडपडताना पाहून गाय विचारपूर्वक हसली आणि तीने वाघाला विचारले, *"तुला मालक आहे कां?"* *"मी जंगलाचा राजा आहे. मला मालक आहे कां म्हणून तू मला कां विचारतेस? मी स्वत:च या जंगलाचा स्वामी आहे!"*
गाय म्हणाली, *"तू जंगलचा राजा असशील, पण इथे तुझी सर्व शक्ती तुझे जीवन वाचवण्यात अपयशी ठरली आहे."*
*"आणि तुझ्याबद्दल काय?"* वाघ उत्तरला. *"तू पण इथेच या चिखलात मरणार आहेस!"*
*"नाही, मी मरणार नाही!"*


गायीने नम्रपणे उत्तर दिले, *"नाही, मी मरणार नाही!",आणि स्वत:लाही मुक्त करू शकत नाही, पण माझा धनी तर ते करू शकतो. सूर्य अस्ताला आल्यानंतर जेंव्हा मी घरी नाही हे पाहून तो मला शोधत येईल. एकदा कां मी त्याला सापडले की, तो मला सोडवून मला आनंदाने त्याच्या घरी घेऊन जाईल!"*
वाघ गप्प झाला आणि गायीला बघत राहिला.
लवकरच सूर्यास्त झाला तसा गायीच्या मालकाचे आगमन झाले. त्याने ताबडतोब झालेली परिस्थिती ओळखली आणि गायीला चिखलातून काढून सुरक्षित घराकडे नेले. घराकडे जात असताना, गाय आणि मालक दोघेही एकमेकांबद्दल कृतज्ञ होते आणि वाघांची दया येऊन त्याला वाचविता आले असते तर त्यांना आनंदच झाला असता.

*येथे गाय एक आत्मसमर्पणशील हृदयाचे प्रतिनिधित्व करते, वाघ एका अहंकारी मनाचे प्रतिनिधित्व करतो आणि मालक गुरुचे प्रतिनिधित्व करतो. चिखल जगाचे प्रतिनिधित्व करते आणि पाठलाग आपले अस्तित्व राखण्यासाठी लागणाऱ्या संघर्षाचे प्रतिनिधित्व करतो.*

*बोध:*
स्वतंत्र असणे आणि कोणावरही अवलंबून न राहणे हे उत्तमच आहे. परंतु हे खूपच टोकापर्यंत ताणू नका ..
आपल्याला नेहमी आपल्या मित्र-मैत्रिणींची / जोडीदाराची / प्रशिक्षकांची / गुरुंची आणि गुरु समान सर्व बंधू-भगिनींची आवश्यकता असते; जे नेहमी आपल्यावर जेष्ठत्वाने लक्ष ठेवत असतात ...

*याचा अर्थ असा नाही की; आपण कमजोर आहाेत ! फक्त त्यांच्या सहकार्याने आपण आणखी मजबूत होऊ शकताे इतकेच* !

*??रामकृष्णहरि* ??

####Good morning!
@मच्छिंद्र माळी औरंगाबाद .
ॐॐॐ आत्मा परात्मा आणि परमात्मा एक संदेश ॐॐॐ

###Good morning !
@मच्छिंद्र माळी औरंगाबाद .
ॐॐॐ हरि ॐ विठ्ठल ॐ
???राम कृष्ण हरी???

शुद्धबीजा पोटीं । फळें रसाळ गोमटीं ॥१॥

मुखीं अमृताची वाणी । देह वेचावा कारणीं ॥ध्रु.॥

सर्वांगीं निर्मळ । चित्त जैसें गंगाजळ ॥२॥

तुका म्हणे जाती । ताप दर्शनें विश्रांती ॥३॥

?????????

###Good mornings !
@मच्छिंद्र माळी औरंगाबाद .
ॐॐॐ जय जय स्वामी समर्थ ॐॐॐ

###Good morning!
@मच्छिंद्र माळी औरंगाबाद .
ॐॐ जय श्रीकृष्ण ! जय राधे !

###Good night!
@मच्छिंद्र माळी औरंगाबाद .
, " मारुती - दुर्मिळ फोटो "
------------------------------
??मारूती हे आपल्या पत्नी सोबत ।।।।अगदी दुर्मिळ फोटो आहे । त्यांचे मंदिर हे कर्नाटक मधील खम्माम याच ठिकाणी आहे।।??

आपणास माहीत आहे का ?
मारूती विवाहीत होता !!

आपल्याला मारूती नाव काढल्यावर एकटा दिसणार, दुसऱ्या देवांसारखा पत्नीबरोबर दिसणार नाही. आपणास तसे पाहायचे असेल, तर आंध्र प्रदेशातील खम्माम जिल्ह्यात जावे लागेल. तेथे मारुतीचे एक प्राचीन मंदिर आहे. हे एकमेव मंदिर आहे. जिथे मारूती आपल्या पत्नी समवेत आहे.

मारूतीने विवाह का केला ?

अशी आख्यायिका आहे की, जेव्हा मारूती त्याचे गुरू सूर्य, ह्यांच्याकडून विद्या शिकत होते, तेव्हा त्याला ९ विद्यांपैकी ५ विद्या शिकवल्या. पण शिल्लक ४ विद्या शिकण्यासाठी विवाहीत असणे गरजेचे होते. (तशी अटच असते) आजीवन ब्रह्मचारी राहाण्याचे व्रत घेतलेला मारूती खूपच बेचैन झाला. शिष्याला द्विधा मनस्थितीत पाहून सूर्यदेवांनी सांगितले की, तु माझ्या मुलीशी विवाह कर. सूर्यदेवांची मुलगी सुवर्चला तपस्विनी होती. मारूतीबरोबर विवाह करून सुर्वचला परत तपस्या करायला गेली. अशा प्रकारे मारूतीने विवाहाची अट पूर्ण केली होती आणि ब्रह्मचारी राहाण्याचे व्रतही पाळले होते. मारूतीच्या या विवाहाचा उल्लेख पराशर संहीतेमध्ये आहे.
खम्माम या ठिकाणी विवाहीत जोडप्याने येऊन त्या सपत्निक मारूतीचे दर्शन घेतले, तर त्या दांपत्यामध्ये प्रेम, सुख-शांती नांदते, अशी धारणा आहे.

###Good afternoon !
@मच्छिंद्र माळी औरंगाबाद !

####Good afternoon !
@मच्छिंद्र माळी औरंगाबाद .
*१३ जुलै - निळू फुले स्मृतिदिन*

'बाई वाड्यावर या' म्हणत आपल्या रांगड्या आवाजाने प्रेक्षकांच्या मानावर आधिराज्य गाजवणारा पडद्यावरचा रगेल आणि रंगेल खलनायक आणि खऱ्या आयुष्यातील निर्मळ माणूस निळू फुले यांचा आज नववा स्मृतिदिन आहे.

13 जुलै 2009 रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मराठी चित्रपटसृष्टीतील खलनायकांचा विचार केला तर सगळ्यात आधी डोळ्यापुढे येतात, ते सरपंच निळू फुले. त्यांच्यासारखा खलनायक मराठी चित्रपटसृष्टीत झाला नाही आणि होणारही नाही, असं म्हटलं तर वावगं वाटायला नको. 

रंगमंच असो किंवा मोठा पडदा, प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याची ताकद निळू फुलेंच्या अभिनयामध्ये होती. 80-90च्या दशकात त्यांनी मराठीमध्ये रंगवलेला कपटी सरपंच आजही आपल्या डोळ्यासमोर आहे.

'बाई वाड्यावर या' हा निळू फुले यांचा डायलॉग अजरामरच झालाय. तो आज अनेक ठिकाणी ऐकू येतो. पण त्या पलीकडचे निळूभाऊ जाणून घेणं आणि त्यांचा आदर्श ठेवून काम करणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे.

************************************