####Good afternoon !
@मच्छिंद्र माळी औरंगाबाद .
*१३ जुलै - निळू फुले स्मृतिदिन*
'बाई वाड्यावर या' म्हणत आपल्या रांगड्या आवाजाने प्रेक्षकांच्या मानावर आधिराज्य गाजवणारा पडद्यावरचा रगेल आणि रंगेल खलनायक आणि खऱ्या आयुष्यातील निर्मळ माणूस निळू फुले यांचा आज नववा स्मृतिदिन आहे.
13 जुलै 2009 रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मराठी चित्रपटसृष्टीतील खलनायकांचा विचार केला तर सगळ्यात आधी डोळ्यापुढे येतात, ते सरपंच निळू फुले. त्यांच्यासारखा खलनायक मराठी चित्रपटसृष्टीत झाला नाही आणि होणारही नाही, असं म्हटलं तर वावगं वाटायला नको.
रंगमंच असो किंवा मोठा पडदा, प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याची ताकद निळू फुलेंच्या अभिनयामध्ये होती. 80-90च्या दशकात त्यांनी मराठीमध्ये रंगवलेला कपटी सरपंच आजही आपल्या डोळ्यासमोर आहे.
'बाई वाड्यावर या' हा निळू फुले यांचा डायलॉग अजरामरच झालाय. तो आज अनेक ठिकाणी ऐकू येतो. पण त्या पलीकडचे निळूभाऊ जाणून घेणं आणि त्यांचा आदर्श ठेवून काम करणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे.
************************************