Marathi Quote in Blog by Vrishali Gotkhindikar

Blog quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

....वेगळा ..!"

.तसे तर खूप जण असतात
..माझ्या अवतीभवती "माझे ' असे ..
पण तुझे "वेगळेपण "सगळ्यात उठून दिसत असते .
माझ्या रुपाची 'पावती 'तुझ्या डोळ्यात झळकत असते
माझ्या गुणांचे "कौतुक तुझ्या शब्दात असते !!
माझा अवखळपणा ..
माझी .न थांबणारी बडबड !
माझा मनमोकळा स्वभाव
माझे बिनधास्त वागणे ,,.
तुला .खुपच "अप्रूप ' वाटत असते ..
पण जेव्हा म्हणतोस ना ..तू
"..जरा जपून रहात जा ग ,..
उगीच माझ्या जीवाला" घोर "नको लावत जावू "..!
..तेव्हाच मला तुझी माझ्या विषयीची' काळजी " कळून येत असते ..
आणी मग त्या क्षणी मी झालेली असते तुझी आणखीन जवळची 'मैत्रीण "!

..........................................वृषाली **

Marathi Blog by Vrishali Gotkhindikar : 112029921
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now