पावसाची ..खुशाली' ....!!
काल ..केला होता ..फोन पावसाला ..
कधी' ..येतो आहेस बाबा ?"..असे विचारायला ..
माणसांचे ..इकडे चाललेत .हाल "..
..तुझी तरी सांग .."काय हाल हवाल "??
..असेच .बघावे म्हणले त्याला सांगून ..
काय ,,उत्तर येतेय ..पाहू ..त्याच्याकडून ...
.बराच वेळ ..फोन वाजताच ..होता ...!
..उचलायला ..बहुधा वेळच ..होत नव्हता ..
..नंतर ..ऐकू आले .."इस ..रुटकी ..सभी लाईने "व्यस्त "..
.ऐकून ..ऐकून ..मी पण झाले "त्रस्त "!!
..रागारागाने ..फोन ठेवून .दिला ...!
....'कुठे ..कडमडला ..आहे कोण जाणे."?..उद्धार त्याचा केला ..
..नंतर मात्र ..त्याचाच .".एस ..एम एस "..आला
..तिकिटांचा ..थोडा "गोंधळ '..झालाय .म्हणला ..
..या ..आठवड्यात ..येणे नाही ..होणार ..
..पंधरा ..दिवसांनी ..मात्र "वाजत गाजत"..येणार ..!!
..वाचून .".एस ..एम एस "....मनाची "तसल्ली "..झाली ..
...त्याच्यावर."कविता ",..करायला लगेच सुरवात केली ..!!
.....................................................वृषाली ***