“आयुष्याचे काही पानं”
आयुष्य म्हणजे एक सुंदर प्रवास आहे,
मंजिल नाही… तर प्रत्येक वळणावरची एक नवी कहाणी आहे.
कधी आनंदाची सर येते,
तर कधी डोळ्यांत नकळत अश्रू दाटतात.
मोठ्या आनंदाच्या शोधात आपण अनेकदा,
छोट्या छोट्या क्षणांना विसरून जातो.
पण हेच छोटे क्षण असतात,
जे पुढे आयुष्यभराच्या सुंदर आठवणी बनतात.
वेळ कधी कोणासाठी थांबत नाही,
पण प्रत्येकाला काहीतरी शिकवून जातो.
आज जे दुःख देऊन जाते,
तेच उद्या आपल्याला मजबूत बनवते.
काही नाती सोबत चालण्यासाठी असतात,
आणि काही फक्त आठवणीत राहण्यासाठी.
प्रत्येक भेटणारी व्यक्ती आपली नसते,
पण प्रत्येक जण काहीतरी शिकवून नक्की जातो.
स्वतःला हरवून कोणाला मिळवू नका,
कारण स्वतःची ओळख सर्वात महत्त्वाची असते.
ज्याच्या मनात आशा जिवंत असते,
त्याचं आयुष्य नेहमी सुंदर असतं.
उद्या काय होईल हे कोणालाच माहीत नाही,
म्हणून आजचा प्रत्येक क्षण मनापासून जगा.
कारण आयुष्य ही निसर्गाने दिलेली सुंदर भेट आहे,
ती प्रत्येक क्षणी अनुभवत राहा.
— शब्दिका ✍️