Marathi Quote in Poem by Reshma Jamadar

Poem quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

स्वाभिमानी बाणा..


टाकला आहे पाय आता तर,
खणखणू दे मग हे रणांगण!
उचलला आहे विडा तर मग,
अभिमानाने रंगवू हे धरांगण!

सूर्य मावळलेला पाहून मी,
झुंज देणे सोडू शकत नाही.
मला लढवय्या म्हणतात हो,
गाजवतो मी दहाही दिशा ही!

सामना माझा तुफानांशी होतो,
झुंज देण्याची सवय आहे अंगात.
माझं रूप आगळं, माझा वेश वेगळा,
जिथं मन रमतं, आलिंगन घेतो त्या रंगात.

माझ्या मातीचा अभिमान,
माझ्या अंगात रुजलाय.
स्वराष्ट्राच्या बाण्यात माझ्या,
रक्ताचा कण अन् कण भिजलाय.

त्या मातीसाठी प्राणार्पण करण्याचं,
शौर्य मला त्या जननीने दिले.
हाती तलवार, कपाळी चंदन लावून,
मला याच जन्मी स्वाभिमानी बनविले!

- रेश्मा जमादार

#शौर्य #मराठीकविता #लढवय्या #स्वाभिमान #मातृभारती

Marathi Poem by Reshma Jamadar : 112027385
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now