कविता
वळण
कधीच नव्हतं अपेक्षित आपल्याही आयुष्यात अचानक कोणी येईल
कधीच नव्हतं वाटल आपल्याही मनाचा ताबा कोणी सहज घेईल
ठेवलं होत स्वतःला ताब्यात कुठ अडकू नये म्हणून
लगामच घातला होता मनाच्या वारूला कुठ बहकू नये म्हणून
आता मात्र मन मुळी ऐकतच नाही आहे
उधळले आहे स्वैर थांबतच नाही आहे
काय घडले असे काहीच कळेना
कुठ काय बिघडलं याच गणित काही जुळेना
आकर्षण मनाचे का शरीराचे हेच काही समजेना
नेमके या वळणावर असे का घडावे हे सुद्धा उमजेना
चाहूल आहे ही सुखाची असे वाटतेय
का सुखच आपल्याला हुलकावणी देतेय
एक मात्र आहे तार दोघांच्या हृदयात झंकारली आहे
आता सूर सुसंवादी निघणार का विसंवादी
हे मात्र दोघांच्या हातात आहे
आलेय वळण समोर आपसुक...
चालूया आता त्या वाटेवर
सुखदुःखात एकमेकांची साथ मागुया जीवन भर