after fighting with her
...😁
आग पेटली उरात,
चंद्र जणू ढासळला...
नको नको म्हणताही
दोघांत भूकंप दाटला...
युद्ध झाले शब्दांचे,
भाव सारे उसळले...
खेळता खेळ नात्याचा
दोन्ही पक्षी हे रुसले...
असा कसा वणवा पेटला
हिमाच्या या गावात?
लागले निशाण खोल
नयनांच्या त्या नेमात...!