कधी काळ होता मैत्रीचा, तासनतास आपण बोलायचो,
कामाच्या त्या व्यापातही, दोन क्षण एकमेकांसाठी काढायचो.
त्या सुंदर मैत्रीचे कधी, हळुवार प्रेमात रूपांतर झाले,
सांगता सांगता कळलेच नाही, आपण कधी एकमेकांचे झाले.
तो पहिला स्पर्श, ती पहिली किस, आजही आठवतेय मला,
लाजत लाजत जवळ आलो, जीव वेडावून गेला होता तेव्हा.
पण वेळ बदलला तसे, वागणे थोडे बदलून गेले,
का प्रेमात पडल्यावर आपण, 'Taken for Granted' धरू लागलो?
"तू माझीच तर आहेस", हा विचार मनाला खाऊन गेला,
आणि प्रेमातल्या त्या ओढीला, जबाबदारीचा वेढा पडला.
तुला हवीत फक्त पाच मिनिटे, दिवसभराचा थकवा घालवायला,
पण मी अडकलो कामात असा, की वेळच उरला नाही बोलायला.
तुला वाटते प्रेम कमी झाले, पण तसे मुळीच नाही ग,
तुला आयुष्याचा जोडीदार बनवण्यासाठी, माझी ही धडपड सुरू आहे ग.
जबाबदारीच्या या जगात, शब्दांची थोडी ओढाताण होतेय,
पण तुझ्यावाचून दुसऱ्या कुणाचा, विचारही मनात येत नाहीये.
तू खूप वेगळी आहेस, अपेक्षा न ठेवता प्रेम करणारी,
माझ्यापेक्षा जास्त फक्त, माझाच विचार तू करणारी.
तुझ्यासारखी दुसरी कुणी, या जगात मला गवसणार नाही,
तू फक्त माझी आहेस आणि मी तुझा, हे कधीच बदलणार नाही.
थोडे समजून घे मला, ही फक्त एक कठीण वेळ आहे,
बोलणं कमी झालं म्हणून काय झालं? आपल्या मनाचा जुळलेला मेळ आहे.
तू नको करू काळजी, मी सदैव तुझ्याच पाठीशी उभा असेन,
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर, मी फक्त तुझाच आणि तुझाच असेन.
- दिपक रिंगे