खालील कविता माझ्या सत्य जीवनावर आधारित !
लोकं 👥 काय म्हणतील❓ या नावाचा🦠 रोग मला झालता⚠️ .
या रोगा पायीचं एक दिवशी मरणाचा योग माझ्या वर आलता⚰️ .
परिस्थितीपुढे मी आतून सजीवपणीच जळलो होतो🔥,
नैराश्य😞 , चिंता😟 , भीती😨 - अदृश्य आवाजांना उत्तर देत डॉक्टरांच्या नजरेत मनोरुग्ण मी ठरलो होतो🩺.
मला हे सगळं का❓ कुणामुळे❓ कधीपासून❓ होतंय हे माझं मलापण कळंना..🤷♂️
ती परिस्थितीच खूप वाईट होती, त्यामुळे कसलाचं मेळ कशाला जुळंना..😓
लहानपणापासूनचं सगळ्यांनीच मला छळलं होतं😢,
माझ्या आत्मसन्मानाचा गळा चिरून आत्म्याला माझ्या मारलं होतं🩸..
सोयीनुसार वापर करून नीच लोकांनी मला टाळलं होतं..🚪🚫
हिजड्यांच्या झुंडीने टोमणे देऊन नैराश्येच्या आजारात मला डांबल होतं..🗣️🔇
मागील पाच वर्षांपासून हा आजार टप्याटप्याने बळावत गेला📈 ,
आशेची किरण नाहीशी झाली आणि विजयाचा सूर्यही मावळता झाला..🌅
जन्म आणि मृत्यूच्या लढ्यात माझी पार वाटं लागली⚔️,
मला जे होतय ते ऐकून डॉक्टरची पण खूप फाटलीं😔.
काही समोर नसून पण दिसायला लागले👁️ ,
चित्रविचित्र आवाजाने कान वाजायला लागले🎧.
सगळ्याच समस्या एकसाथ आयुष्यात माझ्या थाटल्या🙇♂️ ,
होतं असलेल्या मानसिक त्रासाने मेंदूच्या नसा पणं फाटल्या🧠💥.
पोराची अशी अवस्था बघून आईची झोप थांबली🌙,
दवाखान्याच्या रोज रोज चकरा मारून पणं गोष्ट आजूनचं लांबली..🏥🔁
ते दिवस असे होते की मला सूर्याच्या डोळ्यात पण अंधारच दिसत होता☀️➡️🌑,
लोक रोज रात्री झोपत होते आणि माझा डोळा काही लागत नव्हता😵💫.
जगण्याची इच्छा रोज रोज श्वास सोडत होती😶🌫️ ,
माझी परिस्थिती मला आतून क्षणोक्षणी तोडत होती💔.
काळोख्याचे दिवस असेच उलटत गेले🕳️ ,
वेदनांचे बाण माझ्यावर सुटत गेले🏹.
विधात्या कडून एक तारीख ती शेवटची ठरली 🗓️
आसवांच्या शब्दांनी एक काळी डायरी भरली..🖤📓
जगण्याच्या इच्छेचा शेवटचा श्वास सोडायचा प्रयत्न झाला😶⚕️ ,
यमदुताच्या दरबारात माझ्या आगमनाचा अर्ज सादर झाला..👣👼
काय झालं❓ काय झालं❓ - म्हणून सगळीकडे एकचं बोंब उठली..💥
माझ्या निवदंचा घास शिवायला सगळीचं कावळी एकजोमाने सुटली..🕊️..
वार्ता कळताच सगळेच नातेवाईक एकाठिकाणी जुळले🧑🤝🧑,
वेळ नं दडवता माझीं सक्खे गोव्यावरून डायरेक्ट पुण्याकडे वळले🛣️✈️.
माझ्या साठी सर्वस्व पणाला लावून माझीं आई माझ्या मागे सावली सारखी थांबली👩👦👦 ,
भीती आणि वेदनांचे अश्रू ढाळून माझे जवळचे नातेवाईक माझ्या साठी देवदूत ठरली..👼
वाईट परिस्थितीत मला भेटायला माझे सक्खे मित्र आल्याचे कळाले🤝 ,
ज्यांच्या कडे आशा लावून बसलो होतो ते मला सोडून दुसरीकडेच पळाले🏃♂️💨.
माझ्या दुर्दशें पुढे डॉक्टरांची फौज हारली🩺🏳️ ,
लोकांचे सल्ले सरते शेवटी फक्त प्रवचनेच ठरली..🗣️📢
नैराश्य - भीतीत खितपत पडलेलल्या माझ्या शरीर - मनाला माझ्या स्वप्नांनी जीवनदान दिले🌱✨ ,
रोज–रोज मरण्याच्या माझ्या हट्टाला कायमचे विराम दिले⛔️.
समाप्त🙏