त्रिकूट २(हायकू )
१) सल घेऊन २) जळी मासोळी
भूईचाफा फुलला बक ध्यान करी
गंध उरला. कोकीळ गाई
३) वणवा वनी ४) कोण कुणाचा
आर्त जीवांचे मनी वारा विचारी मला
हसल कुणी दिवा का जळे
५) टिळा कपाळी ६) फुलली बघ
चाललो पंढरीसी रातराणी अंगणी
मी वारकरी भूल पडली
७) पाऊस अवेळी ८) मनास मोहे
घाई कर सजनी साज शृंगार तूझा
उडे पाकोळी वेड अनोखे
९) उगाच गाई १०) हले तुळस
कुणी कुणाची व्यथा वाट पाही श्रीरंग
मन मोगरा दिवा अखंड
बाळकृष्ण सखाराम राणे
8605678026