मेहनती मासे
पाण्यातले मासे नाही थांबत
सतत काही काम चालू असत
काय बरे शोधत असतील
ध्यान तर करत नसतील
पाणी त्यांना अडवतो
खुप खुप थांबवतो
तरी पुढे जातात
अन पुन्हा मागे येतात
का घेतात इतका त्रास
थोडा निवांत घ्या श्वास
आहे त्यांना माहिती
उपयोग नाही काही
नको टीव्ही नको मोबाईल
नको कार नको घर
उद्याची काही फिकीर नाही
आणि पोहणे यांच थांबत नाही