*सावळा विठ्ठल माझा*
सावळा विठ्ठल माझा, भक्तांचा तो सखा,
चरणी त्याच्या लोटांगण, विसरते साऱ्या व्यथा।
उभा वाळवंटी धीराने, गळ्यात तुळशी हार,
भक्तांसाठी जागतो, करुणेचा सागर।
पांडुरंगाच्या रूपात, दिसें विलक्षण तेज
त्याच्या साठी सजविली मी अनंरात सेज
विठू माउली माझी, बोलतसे गोड बोल,
भक्तांसाठी वारीत, गाती अभंगाचे बोल ।
पंढरीच्या वाटेवर, ओसंडतो प्रेम भाव
पाहावयां पांडुरंगा, व्याकुळला जीव
मुकुटावर त्या मोर, कटी सोनसाखळी
भेटीस तुझ्या येतो, प्रीत जगा वेगळी
सावळा विठ्ठल माझा, भक्तांचा तो सखा,
चरणी त्याच्या लोटांगण, विसरते साऱ्या व्यथा।
*सर्व अधिकार लेखिकेकडे सुरक्षित आहेत कोणाला शेअर करायची असल्यास नावासहित शेअर करावी ही विनंती 🙏🏼*
*-जान्हवी साळवे.*