झुंझार या करांनी कधी का उमगावे
होऊन षंढ पुरूचा जिवंत का मारावे !
उघड्या डोळ्यात कधी च काही ना दिसावे
मळलेल्या मनाची व्यथा कुणा दाखवावे !!
भुलले जन सारे खोट्या भावनांनी
मेलेल्या भवनाची प्रीत कुणा दिसते
कुस्कराल्या कोवळ्या कळ्यांना
ही कुणा खंत कुणा कळते!!
कळेना उंनाड मनाला झुरावे कुणा सवे मी !
डोळ्यांतील आसवांना लपवावे कुठे मी !!
काढुनी डाव तो खेळ खेळतो मनाशी
होऊनी सखा तो गला कापतो उशाशी !
प्रितीची रात्र ही रक्ताने भिजलेली
होऊनी प्राण प्रिया तू सुडा ने जीव घेतलाशी!!
होऊनी आंधराची साक्ष कुणा द्यावी
पानावल्या डोळ्यांनी ती रात्र कुणास द्यावी!