स्वप्न पाहिले जे होते ,ते आज स्वप्न बनवून राहिल...
याचा विचार स्वप्नात देखील केला नाही, ते आज समोर आले ...
स्वप्नात देखील असे स्वप्न येऊ नये की, त्या स्वप्नात जाऊनही स्वप्नामध्ये स्वप्न आपलं, स्वप्न होऊन स्वप्नातच स्वप्न म्हणून संपून जावं, अगदी स्वप्नासारखंच!!!
खूप स्वप्न होती माझी अगोदर, स्वप्नाच्या दुनियेतच रमाईची मी..
पण जेव्हा वास्तविकता समोर आली तेव्हा स्वप्न पडून ,स्वप्नातच सगळं जगायची मी! !!
किती ते स्वप्न असतात एका मुलीची, पण सगळ्यांचे स्वप्न पूर्ण करता करता तिचे स्वप्न मात्र स्वप्नच बनून राहतं...
माझंही काहीतरी स्वप्न होतं, हे मात्र मला स्वप्नातही आठवत नसतं! !!
माझ्या स्वप्नातील मीच माझी लेखिका मीच कर्तव्यदक्ष गृहिणी मीच माझे रणरागिनी....
हीच प्रत्येक स्त्री जन्माची कहाणी...!!!
🥰Archu🥰