हिवाळी मध्ये आमचं दिवाळी.
आभाळ कोसळले,
वीज चमकले,
वारा सुटला,
गारवा पसरला!
नोवहेंबरमध्ये पाऊस आला.
पसरली बर्फाची चादर,
मुले खेळली बर्फात दिवसभर,
मंद -मंद वारा सुटला वाटलं हृदयाला कोणीतरी भेटला........
हिवाळी मध्ये येते दिवाळी,
बनते लाडू, करंजी, शंकरपाळी,
गोठले हिवळीत तलाव आमचे,
मारून गेले फुले आमुचे.
दूर गेले पक्षी इथून,
फळे दुरावली माणसांकडून,
थंडीमुळे नाही भेटले शेजारी,
पण हिवाळी मध्ये आली रे दिवाळी!
मुंबईमध्ये गर्मी २४ तास,
माणसाचा येथील गुदमरला आहे श्वास,
इंद्र देवांनी दिले वरदान,
मुंबईच्या गर्मीला भेटले नाही जीवनदान.
पाऊस पडला धो - धो
पावसात खेळले मुले खो खो,
झाला पावसामुळे गर्मीचा विनाश,
पण काही ठिकाणी पावसामुळे झाला सत्यानाश.
आली रे आली,
हिवाळी मध्ये दिवाळी आली,
बुजून गेले दिवे आमचे,
विस्कटली रांगोळी घरांचे.
छोट्या घरात शिरले पाणी,
विस्कटली दिवाळीची घरघरची कहानी,
ना लाडू, ना करंजी,
पण ऐकवली दिवाळी कहानी आमच्या पणजी ने.......
"दिवाळी नाही हा सण रोषणाईचा,
हा तर सण माणुसकीच्या नात्याचा,
हात धरले एकमेकांचे आम्ही,
असो वादळ, नाही घाबरणार कुणालाही."
- जिया संतोष कदम