नववर्षा
हे नवीन वर्षा, तुझे स्वागत आहे
तुझ्या प्रतिक्षेत, जन विव्हळत आहे
कारे नववर्षा, तू नवं आणशील का?
का मागील वर्षीसारखाच, रक्तपात आणशील का?
पुरे झाले दुःख, अता सहन होत नाही
परी नवी मनी आस, करते येण्याची घाई
सध्या सा-या समस्या, संस्काराची वानवा
संसारही तयापुढे, आहे सारा थिटा
पीकत नाही शेत्या, नोकरीपाणी नाही
फुकत मिळाले कनेक्शन, पण सिलेंडर नाही
रोजच वाढते भाव, कमी होण्याचे नाव नाही
तेल तिखटही वाढलं, उपाशी राहे काही
निसर्ग कोपतो राजा, कोपले सरकारही
दारु मिळेल दुकानात, खुले झाले बारही
मायबापाची कैफियत, वृद्धाश्रमात असती
जया वाढवलं, तेच बारमंधी मजा मारती
तया गरज आहे, चांगलीच संस्काराची
संसार झाला पोरका, पोरी जाती बारमंधी
हे संसारी नववर्षा, तू गोडीने ये
रुसवे फुगवे सोडून, चांगले संस्कार घेवून ये
अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०