करणी केलीय, नजर लागलीय.
तुमच्या वाईटावर कोणीतरी आहे , कोणाची नजर लागलीय, कोणीतरी जवळची किंवा खूप लांबची व्यक्ती नातलग, मित्र, कामाच्या ठिकाणचे, व्यवसायातील भागीदार आहे ते सतत तुमच्या नुकसानीचा विचार करतात व तसे तोटके,करणी करत असतात , जसे की लिंबू ओवाळून टाकणे, काळी बाहुली वगैरे. ,काही लोकांना कुणाच चांगल बघवत नाही, आपल्यापुढे कोणी जाऊ नये अस वाटत आजकाल स्पर्धेमुळे लोकाना खूप द्वेष ,लोभ ह्या भावना वाढीस लागल्या आहेत. Tv सिरियल्स, काही मूव्हीज सुद्धा यास जबाबदार आहेत.तुम्ही कौतुकाने काही सांगितले किंवा सहजपणे जरी काही शेअर केल तरी ते तुमचा द्वेष, हेवा करू लागतात किंवा त्यांना वाटत की तुम्ही मुद्दाम त्यांना हे सांगून जळवत आहात किंवा त्यांची जिरवण्यासाठी हे बोलत आहात, आता खरच असे लोक पण असतातच.असे लोक ओळखून आपण त्यांच्यापासून लांबच राहिलेल बर, पण हे नेहमीच शक्य होत नाही. कळत नकळत आपण बोलून जातो,दुसर्याच्या डोळ्यात येईल अस वागून जातो. आपली इडा पिडा दुसर्यावर जावी म्हणून रस्त्यावर लोक लिंबू मिरची टाकतात जेणेकरून त्यावरून जो जाईल त्याला आपली संकटे जातील व आपण सुरक्षित राहू असा त्यांचा समज असतो. आता जर आपला देवावर दृढ विश्वास असेल तर आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे की हा विचारच मुळात चुकीचा आहे आणि हा देव माझा तो त्याचा अस काही नसतं तो सगळ्यांचा असतो, सगळ्यांचीच काळजी करतो. करता करविता जर तोच आहे तर तो एकाची संकटे दुसऱ्यावर कशी ट्रान्सफर होऊ देईल? वास्तवात (in fact) हे त्याला रुचणारच नाही आणि असा दुष्टपणा करणाऱ्याला तो शिक्षा करेलच. मग आपण कश्याला उगाच विचलित व्हायच? आता तुम्ही म्हणाल ज्याला त्रास होतो त्यालाच कळत. मग उपाय काय तर तुम्हालाही माहीत आहे आपण देवाची भक्ती किंवा उपासना करण्यापासून आपणास कोणीही परावृत्त करू शकत नाही, त्यासाठी आपण देवळात किंवा आपल्या घरीच आपण त्यास प्रार्थना पूजा करू शकतो . त्यासाठी आपणास कोणी काय सांगण्याची गरजच काय. आपणास त्याला फक्त एवढेच सांगायचे की माझ्यावरच संकट दूर कर ,तो तर सर्व जाणून असतो, त्याला हे पण सांगण्याची गरज नाही पण आपल्या समाधानासाठी आपण हे त्याच्याकडे बोलू शकतोच ना? त्यासाठी कोण्या agent किंवा दुसर्याच गरजच नाही, बर ही कोणी व्यक्ति जर सांगेल की हा उपाय ,हा तोटका करा त्याला काय देवाने कानात सांगितल का सैतानने अस कर मग अस होईल? सर्व संत महात्मा सांगून गेलेत फ़क्त देवाच नामस्मरण केल तरी तो तुमच संकट दूर करेल. आपली देवावरील श्रद्धा अढळ ठेवुन आपण देवापुढे फ़क्त अस करणाऱ्याला सद्बुद्धी दे अशी प्रार्थना करावी खूपच राग आला तर त्याच दुष्कृत्य त्यावरच उलटू दे अस म्हणु शकतो. पूर्वी शारीरिक व्याधी वर उपाय मर्यादित होते आता बरेच उपचार आलेत तरी काही आजार e.g कॅन्सर काही मानसिक आजार बरे होण्यास आधुनिक शास्त्रात मर्यादा आहेत. जीवन जगताना काही भौतिक गरजा निर्णय चुकल्यामुळे मिळत नाही जस की शिक्षण, करिअर संपत्ती. काही गोष्टी जन्मतःच असतात जस की गरीबी, श्रीमंती, शारीरिक स्वास्थ्य पण ह्या गोष्टीवर कधी कधी मात करता येऊ शकते. उगाच ह्या गोष्टीचा विचार करून आपण आपल मानसिक स्वास्थ्य गमावू नये कोणाच्या नादी लागून पैसे घालवू नये .अश्या बर्याच गोष्टी प्रॅक्टिस करताना पाहिल्या अनुभवल्या म्हणून हा लेख.