तो &ती -कथा : गरिबीचे चटके


आपल्या सताळ उघड्या नेत्रांनी ती त्या कौलारू घरात शिरणारा लहानसा कवळसा पाहत होती. मे महिन्यातली तप्त उन्हे तापमानात आता परमोच्च शिखरावर होते. ओसाड असलेल्या त्या कौलारू खोलीत ती मध्यभागी निजून होती. तीच्या बाजूलाच कवळश्याचा लहानसा टीपका पडला होता. ती मूर्तीसारखी निश्चल होऊन पापणीही न लवता फक्त वर कोळ्यांच्या जाळ्यांनी घेराव घातलेल्या भिंतीला पाहत होती. खोलीत गर्द काळोख पसरला होता.. ठीकठिकाणी छिद्रे दिसत होती. मुळातच गर्भश्रीमंत असलेली ती.. या सर्व प्रसंगामूळे तीच्या मनाचा कोंडमारा होत होता. दोन महिन्यापूर्वी असलेली तिची गुलाबाची काया आता पार बदलून गेली होती. चेहऱ्यावरील रेषा खोल गेल्या होत्या.. तीचा स्वच्छ आकर्षण चेहरा घामाने डबडबला होता. हाताला मोठमोठाली फोडे आली होती. जागोजागी चटके बसून तळहात लालसर झाली होती. एवढ्यात दारावर एक थाप पडली तशी ती हर्षउल्हासित झाली.. तीला वाटलं 'तो' आला असेल. तिने जराही वेळ न दवडता दरवाजा उघडला. बाहेर कुणी दारुड्या वासनागंध नजरेने तीला पाहत होता. तीच्या अंगाला सश्याचा कंप सुटला. तिने लागोलाग दरवाजा बंद केला आणी कितीतरी वेळ तशीच एकटीच रडत होती.

एका तासाने दार पून्हा वाजलं.. यावेळी तीला जाणवलं की तो आला आहे. त्याला सरळ चालणही होत नव्हतं. तो घरचा एकुलता एक होता आणी अभ्यासतही अव्व्ल म्हणून त्याने कधीही अंगमेहनतीच काम केलं नव्हतं पण आता पळून लग्न केल्यावर हे सर्व सोसावं लागतच होत..काही वेळात दोघेही जेवायला बसली. त्याला पाठ भिंतीला टेकवून बसायलाही त्रास होत होता
" काय रे फारच अंगमेहनततीच काम केलंय का?" ती त्याच्या पाठीवरून हात फिरवून म्हणाली
" नाही गं " तो कृत्रिम हास्य आणत फक्त एवढंच म्हणाला. तीचा हात जवळ घेत त्याने डोळे मोठे करून विचारले
" तुझ्या हाताला एवढी फोळे कशी काय आली ". अश्रूचा एक थेंबही बाहेर येऊ न देता ती म्हणाली
" अरे! मला अशी चुलीवर स्वयंपाक करायची सवय नाही ना.. होईल सवय हळूहळू "

त्या दोघांना एकमेकांच प्रेम तर मिळालं होत परंतु गरिबीचे चटके त्यांना जोरदार चपराक लावत वास्तवाची अनुभूती करत होती.

समाप्त



--- निखिल देवरे

Marathi Story by Nikhil Deore : 111915719

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now