निर्मिती-
करूनि अंधःकाराचा नाश
प्रगट होई स्वयंभूपणे 'ईश्वर'
इंद्रिया अगोचर, अर्चित्य सनातन परमात्मा,
करी स्वतःचे प्रगटन
उदक म्हणजे जल नव्हे तर ते असे शक्तीरूप तत्व,
असे त्यात सामर्थ्य सृष्टी बीज धारणेचे,
उदकांत पेरणी केली बीजाची,
अंकुरित होउन ते प्रगट झाले अंडाच्या रूपाने, तेजस्वी ते सुर्याप्रमाणे,
अंडाच्या गर्भात परमात्म्याने जन्म घेतला,
उदके नरापासून (परमात्मा) निर्माण झाली म्हणून त्याना म्हणतात नारा,
नारा असे परमात्म्याचे विश्रांती स्थान म्हणून म्हणती त्यांस नारायण.
करूनी दोन शकले अंडाची निर्मिती केली द्योलोक, भुलोक, आकाशाची, आणि महासागराची, दिशा व ग्रह ताऱ्यांची. आत्म्यापासून निर्मिले सत् असत् स्वरूपाचे मन मनापासून निर्मिती अहंकार जो असे 'मी:
मी असे ईश्वर, कार्ये पार पाडण्यास समर्थ तो, मग निर्मिती झाली महान आत्म्याची व त्रिगुणांची व पांच इंद्रियांची,
आत्मविकारातून केली निर्मिती देव, मनुष्य, पशुपक्षी, माती, दगड, वनस्पती, जलचरांची, पंचेंद्रियांनी आश्रय केला व अवयवानी निर्माण झाले ते मूर्त शरीर,
या शरीरात प्रवेश केला पंचमहाभूतांनी कर्मासह, अविनाशी मनही शिरले सुक्ष्म अवयवासह, बुद्धि, अहंकार, पृथ्वी, आप, तेज, वायु व आकाश या तत्वातून निर्मिती देहांची.