एका कवितेसाठी तरी
सख्या
काय जादु केली तु कुणास ठाऊक
पण सारखी हुरहुर आहे मनात
कधी वाटतं बोलतच राहावं
तर कधी वाटते सोडुन द्यावं
सख्या तु दूर असला तरी
मला दिसतोस, माझ्या अंतकरणातुन
मलाही फायदा होतोच तुझा
एक कविता लिहिण्यासाठी
हवं तर मला मदत करशिल का?
की क्रिष्ण बनुन सोडून जाशिल
राधेला एकटी सोडुन
मी म्हटलं तु ओळख आधी मला
आपल्या अंतकरणातुन
माझे चांगले वाईट गुण
खरं तर दोन दिवसात
ओळख होत नाही
पण तु म्हणतोस
मी अंतर्यामी आहे
क्रिष्णासारखा स्थीतप्रज्ञ
त्या दूर क्षीतीजापलिकडील दिसतं मला
काय वेडा आहेस की काय रे
पण नाही सख्या, माझेच चुकले
हवं तर मला माफ कर
मी तुला ओळखु शकले नाही.
तुझ्यात असतीलही वाईट गुण
तुला मी दोन दिवसात ओळखलेही नसेल.....तरी
तु माझी प्रेरणा आहेस
पुढील प्रवासातील
निदान एका कवितेसाठी
एक कविता लिहिण्यासाठी........
अंकुश शिंगाडे
(सखीच्या शब्दात)