दया घ्या
त्या तमाम हिजड्यांना सांगते माझी कविता अन् माझे शब्द
माझा शेतकरी बाप मरतोय
तसा माझ्यातला साहित्यिक ही
वेदनेने पछाडला माझा बांधव
चार रुपयानं पेरायला धान्य घेतो
त्याला सल्फेट, निंदन,किरकोळ खर्च,पाच रुपये
अन् विकतांना एक रुपया भाव
लागत दहा रुपये,
मिळकत एक रुपया
वरुन कर्जाची परतफेड
दुष्काळ कोरडा,ओला
आत्महत्या घडणार नाही तर काय?
ते मात्र बंगल्यात
वारांगणाच्या कवेत
रासलीला मनवत
सिगारेटचा धुव्वा उडवीत
दारुच्या नशेत
शेतक-यांच्या कर्जमाफीचे निर्णय घेतात
खरंच त्यांना शेती म्हणजे
एसीचे बंगले वाटतात की काय?
त्यांनी कधी शेती तरी केली काय?
कांद्याला आलु समजणारे
हेच ते नौटंकीबाज
आज आमच्यावर आत्महत्येची पाळी त्यांनीच आणली हे आम्ही कसे विसरु?
खरंच विचार करा बापांनो
आतातरी जागे व्हा
आम्हालाही आहेत भावना
आम्हालाही आहेत लेकरं
अन् आम्हालाही आहे देशाला पोषणं
आतातरी आमची दया घ्या
आतातरी आमची दया घ्या
अंकुश शिंगाडे लेखक नागपुर