ईश्वर भक्ती
ज्या प्रमाणे रोग्याला औषध दिल्यावर त्याचा परिणाम त्याच्या मानस व शरीरावर दिसून येतो व त्याची प्रकृती सुधारते, त्याचप्रमाणे जर कोणी खरच ईश्वर भक्तीस लागला असेल, तर ते त्याच्या वागणुकीतून दिसून यायलाच पाहिजे जसे की दुसर्या प्रति असलेल्या त्याच्या स्नेहातून , कणव व सदविवेक बुद्धीतून , सर्वांना समान लेखण्याच्या, दुसर्याच्या दुःखात त्यांना मदत करण्याच्या वृत्तीतून,
न की स्वताच्या ईश्वर भक्तीचा दिखावा, व कर्मकांडाचे अवडंबर माजवून.