Marathi Quote in Poem by Kalyani Deshpande

Poem quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

असा हाय पिंट्या

स्वतः साठी जगायचे गेले राहून
काय करायचे आता पुढे जाऊन?
म्हने हार्टब्रेक झालेला पिंट्या
येई रडे त्याले राहून राहून

म्हने काय करायचे पुढे जाऊन
अरे सिटा घे न रुमाल ठेवून
एकदा गर्दी वाढली बसमंदी
की जा लागते मंग हुबं ऱ्हाऊन

तरीबी हुबा तथिच पिंट्या दगडावानी पाय रवून
मायबाप बघे त्याकडे मंग रागाने दात ओठ खाऊन
अरे जाय न लेका भैताडा म्हनला त्याचा बाप जवा
तवा गेला म्होरं पिंट्या गळ्यात चार झोरे घेऊन
★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★

प्रस्तुत कविता वैदर्भीय ग्रामीण भाषेत लिहिलेली आहे

Marathi Poem by Kalyani Deshpande : 111903851
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now