*** आठवण आईच्या जेवणाची ***
!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
संध्याकाळी घास खाताना आई आठवण येति रोज,
काय तो डाळ भात अन वरी तुपाची साज !!
धगधगत्या चुलीवरची गरमागरम तेल मीठ भाकरी ती खास,
गाढग्यातलं रटरटत कोरड्यास मनावरती करी राज !!
मुटके मुटके मारून चिवडा खायचो काय ती मौज,
करंज्या,लाडू,शेव काय त्या दिवाळीच्या फराळाची फौज !!
घरी आल्यावर आई, दोन घास सुखाचे भरवशील हि माझी आस,
वाट बगतोय कधी तो दिवस येईल खास !
कधी तो दिवस येईल खास !!
- नागेश डांगे (मु.पोस्ट.चारे)