Marathi Quote in Thought by Rajendra Mahajan

Thought quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

रुढी आणि मानापमान

रूढी ह्या काळानुसार बदलल्या पाहिजेत, एक हे करतो म्हणून मी हे करायलाच पाहिजे किंवा मला आता हा मान मिळायलाच पाहिजे हा सारासार विचार प्रत्येक विचारी माणूस करेल तर अनेक सामाजिक अनिष्ट गोष्टी बंद होतील व नात्यां मधील मानापमान गैरसमज थांबतील पण बरेचसे लोक रुढी आहे मग तस करायलाच पाहीजे अशा विचाराचे असतात.कधी कधी ह्यामुळे नातलगां मध्ये चढाओढ लागते मी किती ह्यावर खर्च केला? जेव्हढा जास्त खर्च दिखावा तेवढा मानपान जास्त . ह्यात खरच आदर असतो? काही लोक इतर वेळी देणी घेणे करतात रूढी संबंधि ते जास्त विचार करत नाहीत हे पण ठीक तर काही इतरवेळी देणी घेणे नको म्हणतात पण रूढी वेळी त्यांना चालत पण अशावेळी जर दिल त्यात समाधान असेल तुलना नसेल तर हे सुद्धा ठीक आहे.सर्वच रूढी बेकार असतात अस नाही संस्कृती व समाज टिकवून ठेवण्यासाठी व एकत्र येण्यासाठी काही आवश्यक आहेत. शेवटी रूढी या माणसांसाठी माणसाने बनवलेल्या आहेत ना की रूढी साठी माणूस.ह्या लेखात रूढीवादी व रूढी न मानणारे ह्यांचा मन दुखावण्याचा हेतू नाहीये.

Marathi Thought by Rajendra Mahajan : 111888246
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now