विठू हिच्या चालीने चालतो
विठु हिच्या गालात हासतो
विठु हिच्या हातचवीत उतरतो
विठु माऊलीच्या मनात नांदतो
धन्याच्या डोईवरली खोळ होतो
बैलांच्या गळ्यातील घुंगरु होतो
इथल्या मऊ ढेकळांत सामावतो
पिकांच्या रुपात शेतांतून नांदतो
पावसाच्या लयसरींनी बरसतो
विठु असा माझा चराचरात वसतो
चराचरात वसतो..
©® गीता गरुड.