वाऱ्याची झुळूक मला तुझी
आठवण करून जाते
तुझी चाहूल मनाला
प्रेमाची साक्ष देऊन जाते
ते तुझे हसणे आजही
आठवते मला
ते तुझे माझ्या जवळ
बसणे वेड लावे जीवा
तुझीच प्रतिमा मनात
तु आहेस समोर ही
हीच असते का ओढ
त्या अल्लड प्रेमाची
मृगनयनी तु प्रिय सखे माझी
तु आयुष्यात आलीस माझ्या
अन सारी स्वप्ने पूर्ण झाली