तुटला तारा तुटल्या माळा
असंख्य मोती सांडले गेले ,
नकळत किती सारे किस्से
या लेखणी मधून मांडले गेले !
सांगू पाहिले शब्दांमध्ये
ती हर कहाणी अमर झाली ,
शब्द आले संपत आता
कविता माझी अबोल झाली !
पाकळी पाकळी सजवताना
कवितेच्या गुलाबावरती ,
टोचत काटे हाताला मग
आसवांची झाडाझडती !
गाडत होते ज्या जखमेला
ती अजुन खोल झाली ,
शब्द आले संपत आता
कविता माझी अबोल झाली ...
Siya S.