स्त्री मुक्त झाली?
हातभर घुंघट गेला अन
साईड पीन आली म्हणुन का?
संपली सारी गुलामी अन
स्त्री मुक्त झाली?.....
डोईवरचा टोपल गेलं
गेला असलं खोचा
फक्त पर्स आली खांद्यावर
अन उंच झाल्या टाचा
लेकरू परी वाट पाहे
विवंचनेत दोघीही
आहे अजुन टांगलेली
कोण म्हणतं.,,,
पर्स आली तशी
मोबाईल ही आला
पर सांगावं लागतं जी
रिचार्ज कि हो संपला
पासबुक कुलुपबंद एटीम खिशात
ती फक्त मनीमशीनच राहिली
कोण म्हणतं......
बसता गप्प अळिमीळी
तु खुप खानदानी
बोलता चारचौघात
बाई लय अवगुणी
मिळती विशेषणे शेलकी
दवंडी पिटे गल्लोगल्ली
कोण म्हणतं....
खणखणीत भाषणात
अजुनही समानतेच्या गप्पा
पुरुषसत्ताक समाजा
गाठायचा खुप मोठ्ठा टप्पा
करून मुस्कटदाबी चहुकडुन
म्हणती चर्चा आहे खुली
कोण म्हणतं....
©️सुजाता भोजने
अंबाजोगाई