अजुन घंटा तयार नाही
एकदा की ना उंदराची भरली मोठी सभा
तीस चाळीस उंदीर झाले की हो जमा
विषय तसा होता खूपच गंभीर
मांजराचा गळ्यात घंटा कोण बरे बांधणार ?
सगळेच म्हणू लागले मी नाही मी नाही
मग सभापती म्हणाले मी करतो काही तरी
सगळे उंदीर झाले भलतेच खुश
ठरल मग जागा आणि वेळ
मांजर आली मोठ्या तोऱ्यात लागली हसायला
म्हणते कशी, घंटा कोण येणार बांधायला?
सगळे एकमेकाकडे बघू लागले
काय करूया विचार करू लागले
एक म्हणाला, "घंटा अजुन तयार नाही."
मांजर लागली हसायला हा हा हा.. ही ही ही..