एकदा *कुत्र्यात* अन *गाढवात*
पैज लागते की,
जो पण लवकरात लवकर पळत जाऊन २ गावं पलीकडच्या सिंहासनावर बसेल तोच त्या सिंहासनाचा मानकरी ठरेल...
ठरल्या प्रमाणे दोघे तयार झाले,
*कुत्र्याला* वाटले मीच जिंकेन
कारण *गाढवापेक्षा* मी जोरात धावू शकतो,
पण *कुत्र्याला* पुढे काय होणार ते नक्की माहिती नव्हते...
शर्यत सुरु झाली
*कुत्रा* जोरात धाऊ लागला
पण थोडस पुढ गेला नसेल की लगेच पुढच्या गल्लीतील *कुत्र्यांनी* त्याला हुसकून लावयला सुरवात केली,
असाच प्रत्येक गल्लीत, प्रत्येक चौकात, घडत राहिले
कसा बसा *कुत्रा* धावत धावत सिंहासनाजवळ पोहचला
बघतो तर काय
*गाढव* त्या आधीच पोहचले होते
अन त्यांनी शर्यत जिंकून ते राजा झाले होते
अन ते बघून
निराश झालेला *कुत्रा* बोलला की,
जर माझ्याच लोकांनी मला मागे ओढले नसते तर आज *गाढव* सिंहासनावर बसले नसते...